राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन
कोल्हापूर, १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ‘ब्लॅकमेल’ करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची असंख्य प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
१. शाहूवाडीचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. उदयसिंह कोकरे देसाई (सरकार), श्री. चारूदत पोतदार, अधिवक्ता रोहित जांभळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. चेतन गुजर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अनिकेत हिरवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. अजय गुरव, सर्वश्री सुहास पाटील, विश्वास पाटील, सुशांत तांदळे, जितेंद्र पंडित, भाजपच्या सौ. दया प्रभावळकर, सौ. माया पवार, सौ. सिद्धी विभूते, सौ. उषा देवी सारंगे यांसह हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
२. कागल येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती रूपाली सूर्यवंशी-बरगे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. रुद्राप्पा पाटील, श्री. योगेश निर्मळे यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
३. इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. विनोद ओझा, सौ. अश्विनी स्वामी यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.