(म्हणे) ‘स्त्रीवाद्यांनी भगवे अंतर्वस्त्र घालून विरोध दर्शवावा !’
‘पठाण’ चित्रपटाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे नेते उदित राज यांचे आवाहन
नवी देहली – ‘पठाण’ या आगामी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र वापरल्यावरून हिंदूंच्या संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते उदित राज यांनी ट्वीट करून याला विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘स्त्रीवाद्यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र वापरून या ‘भक्तां’ना उत्तर द्यावे.’ यावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे.
Pathaan Controversy: Congress leader Udit Raj urges feminists to oppose ‘bhakts’ by wearing saffron bikinis and bras https://t.co/Yn1Ox9KVYU
— OpIndia.com (@OpIndia_com) December 17, 2022
१. रश्मी नावाच्या एका ट्विटर वापरकर्तीने म्हटले आहे की, याचा प्रारंभ उदित राज यांनी त्यांच्या घरापासून केला पाहिजे.
२. सादिया यांनी उदित राज यांनाच अशा प्रकारचे अंतर्वस्त्र घालून त्यांचे छायाचित्र प्रसारित करण्याचे आवाहन केले. ‘तसे केल्यास तुमच्या पाठोपाठ लोकही येतील आणि सर्वांना उत्तर मिळेल’, असे सादिया यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.
३. काही जणांनी उदित राज यांना ‘मानसिक रुग्ण’ म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्या काँग्रेसवाल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! |