कोकणच्या विकासासाठी कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण लवकरच स्थापन करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी – कोकणातील जिल्ह्यांचा विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास अन् नियोजन प्राधिकरण लवकरच स्थापन करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळण्यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री , एकनाथ शिंदे यांनी ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी सांगितले…… pic.twitter.com/AzQGQyJ3n3
— 24 taas news (@24taasChannel) December 6, 2022
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की,
१. मत्स्यव्यवसाय धोरणाविषयी प्रयत्न केले जातील. मत्स्यव्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल ? यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तमिळनाडू आणि गुजरात यांच्या मत्स्यव्यवसाय धोरणाविषयी अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.