घाटकोपर येथील इमारतीला आग
रुग्णालयात धूर पसरल्याने रुग्णांना हालवले; एकाचा मृत्यू
घाटकोपर – येथील पंतनगर भागातील ‘विश्वा ब्लॉक’ या इमारतीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भीषण आग लागली आणि इमारतीची दुरवस्था झाली. या आगीचा धूर शेजारीच असलेल्या पारेख रुग्णालयात पसरला. रुग्णालयात आग आणि धूर पसरल्याने येथील रुग्णांना शेजारील रुग्णालयात हालवले. रुग्णांना हालवतांना एक रुग्ण दगावला, तर २ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ५ अग्नीशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या.