आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची स्थापना !
मुंबई – आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी आणि समस्या यांचे निवारण करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करण्यात आली आहे. या सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेना कार्य करणार आहे.
धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री मा.श्री @mieknathshinde यांनी मला अध्यात्मिक क्षेत्राच्या सेनेची जबाबदारी सोपवली.अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी आपल्या माध्यमातून काम करण्याची मला ही मोठी संधी मिळाली. मनःपूर्वक कृतज्ञता @DrSEShinde @sheetalmhatre1. pic.twitter.com/mzm7So1vSq
— अक्षय चंद्रकांत भोसले (@varkariyuva) December 16, 2022
समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता, तसेच संत साहित्याचा जगभरात प्रसार व्हावा याकरता वारकरी ‘संप्रदाय युवा मंच’ या संघटनेच्या माध्यमातून ह.भ.प. अक्षय महाराज भोसले मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या संघटनेत वारकरी संप्रदायासाठी १५ सहस्रांहून अधिक सुशिक्षित युवक काम करत आहेत. ह.भ.प. अक्षय महाराज भोसले हे समाजप्रबोधनपर कीर्तने, वारकरी संप्रदायाचा प्रचार, समाजसेवा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, वारकरी संत साहित्यांचा जागर, कीर्तनातून राष्ट्रीयत्वाची शिकवण, ‘घरात ग्रंथालय’ उपक्रम, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना साहाय्य, व्यसनमुक्तीसाठी कार्य आदी माध्यमांतून कार्यरत आहेत.