राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

हिंदुविरोधी, साम्यवादी, पुरोगामी, निधर्मीवादी आदींकडून हिंदु धर्मावर चोहोबाजूंनी आघात होत असतांना त्याविषयी सडेतोड प्रतिवाद करून हिंदूंना दिशादर्शन करणारे नियतकालिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करतांना हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करते. वृत्ते, विविध हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांचे लेख, चौकटी आदींच्या माध्यमातून हे नियतकालिक हिंदूंमध्ये जागृती करत आहे.

गेल्या २ दशकांपासून कार्यरत असलेल्या या नियतकालिकाचा व्याप प्रतिदिन वाढत आहे. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता आहे. या अनुषंगाने ‘सनातन प्रभात’मधील सेवांमध्ये हातभार लावून तुम्हीही खारीचा वाटा उचलू शकता. आपली आवड आणि कौशल्य यांनुसार तुम्ही पुढील सेवा शिकू शकता. पुढीलपैकी काही सेवा आश्रमात राहून शिकल्यास नंतर घरी राहूनही करता येतील. या अंतर्गत असणार्‍या सेवा पुढीलप्रमाणे आहेत.

१. घरी राहून करता येतील, अशा सेवा

१ अ. इंग्रजी आणि हिंदी या भाषांतील लेखांचे मराठीत भाषांतर करणे

१ आ. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील लेखांचे संकलन करणे

१ आ १. सेवेचे स्वरूप

अ. धारिकांचे प्राथमिक संकलन (लिखाणातील अनावश्यक भाग काढणे, व्याकरण सुधारणे आदी) करणे

आ. धारिकांचे अंतिम संकलन (परिच्छेद करून मथळे देणे, आवश्यकता असल्यास शिरोभाग लिहिणे, वाक्यरचना सुस्पष्ट करणे, भाषांतरित धारिका असल्यास भाषांतर योग्य असल्याची निश्चिती करणे इत्यादी) करणे

इ. साधारण २ सहस्र के.बी. लिखाण असलेल्या वृत्तांचे संकलन करून त्यातील निवडक लिखाणाच्या चौकटी बनवणे (वृत्तातील अनावश्यक भाग काढणे, वृत्तांचे संकलन करून त्याला सुयोग्य मथळा देणे)

या सेवेसाठी राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घडामोडींची प्राथमिक माहिती असावी. आश्रमात राहून वा घरी राहूनही या सेवा करता येतील. काही दिवस आश्रमात येऊन सेवेतील बारकावे जाणून घेतल्यास घरी राहून सेवा करणे सुलभ होईल.

२. आश्रमात राहून करावयाच्या सेवा

२ अ. छायाचित्रांचे वर्गीकरण करणे, तसेच ‘फोटोशॉप’ प्रणालीत करावयाच्या अन्य सेवा

२ अ १. छायाचित्रांवर प्राथमिक काम करणे : छायाचित्रे छपाईयोग्य होण्याच्या दृष्टीने पार्श्वभूमी आणि व्यक्ती सुस्पष्ट असाव्या लागतात. ‘प्रकाशयोजना योग्य नसणे किंवा अपुरी असणे, पार्श्वभूमी (बॅकग्राऊंड) पालटणे’, अशा विविध कारणांमुळे छायाचित्रांवर (फोटोंवर) काम करणे आवश्यक ठरते. अशा ४०० छायाचित्रांवर काम करायचे आहे.

२ अ २. छायाचित्रांचे वर्गीकरण करून आणि १० सहस्र ५० छायाचित्रे त्या त्या विषयांच्या संचिकेत संरक्षित करणे

२ अ ३. छायाचित्रांच्या माहितीची धारिका बनवणे आणि ५०० छायाचित्रांची माहिती ‘एक्सेल शीट’मध्ये भरून ती पडताळणे

२ आ १. सेवेचे स्वरूप : सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांची छायाचित्रे पाहून त्याविषयीची माहिती (उपक्रमाचा दिनांक, सविस्तर विषय आदी) ‘एक्सेल शीट’मध्ये भरणे, छायाचित्रांना छायाचित्रओळ (‘कॅप्शन’) घालणे, त्या संदर्भातील अपूर्ण माहिती संबंधितांना विचारणे

२ इ. विविध वृत्तवाहिन्यांवर झालेल्या कार्यक्रमांची संक्षिप्त माहिती भरणे

२ इ १. सेवेचे स्वरूप : विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होणारी सनातन संस्थेच्या संदर्भातील वृत्ते, संस्थेचे प्रवक्ते सहभागी असलेली चर्चासत्रे, हिंदु धर्माविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे कार्यक्रम यांची चलत्चित्रे (व्हिडिओज्) पाहून त्याविषयीची सर्व माहिती (विवरण, भाषा आदी) ‘एक्सेल शीट’मध्ये भरणे (८३० चलत्चित्रे पाहून त्यांची संक्षिप्त माहिती इंग्रजीत भरावयाची आहे.)

२ ई. संरचना करणे : या सेवेसाठी अल्पकाळ किंवा दीर्घकाळ आश्रमात राहून दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षिक यांची पृष्ठे, तसेच विज्ञापने यांची संरचना करणे

३. वरील सर्व सेवांसाठी आवश्यक कौशल्य

अ. मराठी व्याकरण आणि शब्दरचना यांचे ज्ञान, तसेच संकलनकौशल्य

आ. हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान

इ. मराठी टंकलेखन करणे, एक्सेल शीट हाताळणे, ‘इनडिझाईन’, ‘कोरल’, ‘फोटोशॉप’ या प्रणालींचे ज्ञान

या सेवा करण्यास इच्छुक असलेल्या; परंतु सेवेचे कौशल्य नसलेल्या संबंधितांना त्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येईल. इच्छुकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती श्री. नागेश गाडे यांच्या नावे dspgoa1@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

सनातनच्या आश्रमांतील पुढील सेवांतही सहभागी होऊ शकता !

‘सनातनच्या आश्रमांत पुढील सेवांसाठीही साधकांची आवश्यकता आहे – ग्रंथ, कला, संकेतस्थळ, ध्वनी-चित्रीकरण, संगणक दुरुस्ती, वैद्यकीय, बांधकाम, धान्य, स्वयंपाकघर आणि बेकरी

या सेवांविषयीची सविस्तर माहिती वेळोवेळी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केली जात आहे. वरील सेवांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी sanatan.sanstha2025@gmail.com या संगणकीय पत्त्यावर आपली माहिती कळवावी. यात काही शंका असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर विचाराव्यात.

टपालाचा पत्ता

श्री. नागेश गाडे, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या धर्मप्रेमींचा आधारस्तंभ असणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील वरील सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचला !