साधकांनो, वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील लढ्याचा अंतिम टप्पा चालू असल्याने भगवंतावरील श्रद्धा वाढवा आणि श्रद्धेच्या बळावर सूक्ष्मातील लढ्याला धैर्याने सामोरे जा !
‘सध्या सूक्ष्मातील लढ्याचा अंतिम टप्पा चालू असून ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढा चालू आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी त्रासाचे प्रमाण वाढले असून बर्याच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. पूर्णवेळ साधना करणार्या काही साधकांच्या मनात ‘पुढील शिक्षण घ्यावे, नोकरी करावी किंवा सांसारिक जीवन उपभोगावे’, असे विचार येत आहेत. ‘नामजपादी उपाय केल्यावर हे विचार उणावतात’, असे लक्षात आले.
अनिष्ट शक्तींच्या लढ्याचा हा अंतिम टप्पा असल्याने त्या सर्व बळ एकवटून सूक्ष्मातून सतत आक्रमणे करत आहेत. ईश्वरी राज्याच्या स्थापनेत सहभागी असलेल्या साधकांना अधिकाधिक त्रास देऊन त्या त्यांना साधनेपासून परावृत्त करत आहेत. अनिष्ट शक्तींचा जोर अधिक असला, तरी ईश्वरच रक्षणकर्ता असल्याने साधकांनी खचून जाऊ नये. ईश्वरावर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून नामजपादी उपाय करून स्वत:ची साधना वाढवावी ! अनुकूल काळात केलेल्या साधनेपेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेचे फळ कैक पटींनी अधिक मिळते. त्यामुळे साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय गांभीर्याने करण्यासह साधनेचे प्रयत्न वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
‘साधकांनो, श्रद्धेमुळेच प्रतिकूल काळाला धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळत असल्याने भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून साधनारत रहा ! ’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)
|