‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यावर झालेला परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सालसा’ हा जोडीने करावयाचा ‘सेक्सुअल’ (कामुक) नृत्य प्रकार आहे. ही नृत्यशैली मूलतः क्युबा देशात उगम पावली. ‘युरोपीय आणि आफ्रिकी संस्कृतीतील संगीत अन् परंपरा यांच्या प्रभावातून ‘सालसा’ची निर्मिती झाली’, असे मानले जाते. लॅटिन अमेरिका, अमेरिका, युरोप या ठिकाणी लोकप्रिय असलेली ही नृत्यशैली आशिया अन् आफ्रिका खंडातही लोकप्रिय होत आहे.’ (साभार : संकेतस्थळ)
आजकाल भारतातील तरुण-तरुणींमध्ये ‘सालसा’चे आकर्षण वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी ‘डान्स क्लास’मध्ये (नृत्य प्रशिक्षणवर्गात) जाऊन या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण घेतात. ‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत २ नृत्य प्रशिक्षक (१ स्त्री अन् १ पुरुष) आणि ४ नृत्य शिकणार्या व्यक्ती (२ स्त्रिया अन् २ पुरुष) सहभागी झाल्या. नृत्य शिकणार्यांपैकी १ स्त्री आणि १ पुरुष यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. या चाचणीत सालसा नृत्य प्रशिक्षकांनी नृत्य शिकणार्या व्यक्तींना त्या नृत्याचे प्रशिक्षण दिले. नृत्य प्रशिक्षक अन् नृत्य शिकणार्या व्यक्ती यांची नृत्य करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंदवण्यात आली. सालसा नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यावर झालेले परिणाम पुढे दिले आहेत.
१ अ. ‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यावर पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
टीप – ‘ऑरा स्कॅनर’ने १४० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.
बाजूला दिलेल्या सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. नृत्यानंतर नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
२. नृत्यानंतर पुरुष नृत्य प्रशिक्षक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला पुरुष यांच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळून आली. नृत्यानंतर स्त्री नृत्य प्रशिक्षक, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली स्त्री अन् पुरुष आणि आध्यात्मिक त्रास नसलेली स्त्री यांच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
३. नृत्यानंतर नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
२. निष्कर्ष
‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि ते शिकणार्या व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ नकारात्मक परिणाम झाला.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. ‘सालसा’ नृत्यातून पुष्कळ त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे : सालसा जोडीने करावयाचे कामुक नृत्य आहे. या नृत्यामध्ये पाश्चात्त्य प्रकारच्या वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा यांचा अंतर्भाव असून त्याला पाश्चात्त्य संगीताची जोड दिली जाते. कामुक नृत्यात सहभागी व्यक्तींच्या मनात कामवासनेच्या विचारांचे प्रमाण वाढते. थोडक्यात हा नृत्य प्रकार आणि त्याच्याशी संबंधित घटक (उदा. वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा, पाश्चात्त्य संगीत इत्यादी) असात्त्विक असल्याने त्यांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली.
३ आ. कामुकता उत्तेजित करणार्या सालसा नृत्यामुळे नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींचा सूक्ष्मातील वाईट शक्तींचा त्रास वाढणे : आजकाल सर्वांनाच अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास असतो. चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींना सूक्ष्मातील वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. कामुकता उत्तेजित करणार्या सालसा नृत्यामुळे नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींचा सूक्ष्मातील वाईट शक्तींचा त्रास वाढला. वाईट शक्तींनी याचा अपलाभ घेऊन नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींवर त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केली. याचा नकारात्मक परिणाम नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींवर झाला.
३ इ. सालसा नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यावर पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे : नृत्यापूर्वी नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यामध्ये नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होती. सालसा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या त्रासदायक स्पंदनांमुळे नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या भोवती असलेल्या त्रासदायक आवरणात पुष्कळ वाढ झाली. त्यामुळे नृत्यानंतर त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. वाईट शक्तींनी नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींचा त्रास वाढल्याने त्यांच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळून आली किंवा तिच्यामध्ये पुष्कळ वाढ झाली. तसेच नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या देहातील सकारात्मक स्पंदने नाहीशी झाली. थोडक्यात सालसा नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्या व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ नकारात्मक परिणाम झाला.
३ ई. चाचणीतील सालसा नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींना झालेले त्रास : चाचणीतील सालसा नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींनी सांगितले, ‘हे नृत्य करतांना त्यांच्यातील कामवासना उफाळून आल्या. नृत्यानंतर त्यांना शारीरिक थकवा येणे, डोके दुखणे, काही न सुचणे, बराच वेळ मनात कामवासनांचे विचार घोळत रहाणे इत्यादी त्रास झाले.’
सौ. मधुरा धनंजय कर्वे , महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.३.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
|