देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही कक्षाच्या माध्यमातून २ संशयित महिलांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले !
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सीसीटीव्ही कक्षाच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिरात येणार्यांवर लक्ष ठेवून २ संशयित महिलांना पकडून राजवाडा पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. देवस्थान समितीचा सीसीटीव्ही कक्ष भाविकांच्या काळजीसाठी सतत कार्यरत असतो आणि चोरी, तसेच अन्य घटना टाळण्यासाठी सतर्कतेने प्रयत्न केले जातात. विशेष करून गर्दीच्या कालावधीत याचा लाभ भाविकांना होतो.