‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना जमशेदपूर (झारखंड) येथील सौ. रेणु शर्मा यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
‘सनातनचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील भगवद्गीता आहेत. शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे, म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे. सनातनच्या ग्रंथांचे जे अध्ययन करतात, त्यांना या ग्रंथांतील ज्ञान आणि चैतन्य यांचा लाभ होऊन त्यांचे साधनेचे पुढील मार्गक्रमणही शीघ्र गतीने होते.’ – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था, कर्नाटक राज्य. (ऑक्टोबर २०२१) |
१. वाचकांना ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे ग्रंथांची माहिती सांगणे आणि त्यांनी ‘नंतर कळवतो’, असे सांगणे
‘माझे एका वाचकांकडे जाण्याचे नियोजन झाले होते. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, आपणच माझ्या समवेत यावे आणि माझ्याकडून ही सेवा करवून घ्यावी.’ मी त्या वाचकांना सनातनच्या चैतन्यमय ग्रंथांविषयी सांगितले. त्यांना ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे (टीप) ग्रंथांची माहिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी नंतर कळवतो.’’
टीप – हे एक ‘सॉफ्टवेअर’ असून याद्वारे संबंधित विषयाची विविध वैशिष्ट्ये दर्शवता येतात.
२. वाचकांना ग्रंथ दाखवल्यावर त्यांनी ‘सर्व ग्रंथ पुष्कळ चांगले आहेत’, असे सांगून काही ग्रंथ खरेदी करणे
तेव्हा परात्पर गुरुदेवांनी मला सुचवले, ‘त्यांना ग्रंथही दाखवले पाहिजेत.’ मी त्यांना ग्रंथ दाखवल्यावर ते ग्रंथ हातात घेऊन त्याची पृष्ठे पालटू लागले. काही वेळाने त्यांनी सांगितले, ‘‘तुमचे सर्व ग्रंथ पुष्कळ चांगले आहेत.’’ त्यानंतर त्यांनी एकेक करून ७ – ८ ग्रंथ घेतले.
३. वाचकांच्या पत्नीने स्वतःसाठी काही ग्रंथ खरेदी करणे
त्यांनी त्यांच्या पत्नीलाही बोलावले आणि तिला सांगितले, ‘‘यांचे हे सर्व ग्रंथ किती चांगले आहेत !’’ त्यांच्या पत्नीनेही ग्रंथ हातात घेतले आणि १ – २ पृष्ठे चाळून पाहिल्यावर तिलाही चांगले वाटू लागले. तिने स्वतःसाठीही ग्रंथ घेतले.
४. नंतर माझ्या लक्षात आले, ‘त्या वाचकांनी सात्त्विक ग्रंथ हातात घेतल्यावर ग्रंथांतील चैतन्यामुळे त्यांना चांगले वाटले आणि ग्रंथ पाहून त्यांना आनंद मिळाला.’
५. ते साधनेविषयी पुष्कळ वेळ बोलले आणि त्यांनी ‘मी ग्रंथ निश्चितच वाचीन’, असे सांगितले.
६. त्यांनी मला दोन प्रसिद्ध व्यावसायिकांचे संपर्क क्रमांकही दिले.
७. ‘गुरुदेवांनी मला या सेवेसाठी माध्यम बनवले’, याबद्दल मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझी भावजागृती झाली.’
‘गुरुकृपेने आम्हा सर्वांना या दैवी अभियानात सहभागी होण्याची अमूल्य संधी मिळाली’, त्याबद्दल गुरुदेवांच्या विश्वव्यापक चरणी आम्ही सर्व जण कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्रीमती रेणु शर्मा, जमशेदपूर, झारखंड. (जानेवारी २०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |