ठाणे येथे पाकिस्तानच्या विरोधात भाजपचे आंदोलन !
|
ठाणे, १७ डिसेंबर (वार्ता.) – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याचाच निषेध करत भाजपकडून ठाणे रेल्वेस्थानक परिसरात आंदोलन करण्यात आले. त्या वेळी भाजपच्या वतीने पाकिस्तानच्या झेंड्याचेही दहन करण्यात आले. त्याचप्रमाणे बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून, तसेच ते फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. ज्या देशाचे स्वतःचे अस्तित्व नाही, त्या देशाने भारतासारख्या सक्षम देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात बोलणे चुकीचे आहे. संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला घेतला जातो आणि अशा प्रंतप्रधानांच्या विरोधात टिपणी केलेली खपवून घेतली जाणार नाही, असे या वेळी भाजपकडून सांगण्यात आले.