अकोला येथे २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
अकोला – ५ ते ६ नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना १६ डिसेंबरच्या रात्री घडली. शहरातील न्यूतापडिया नगर भागात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघी जणी मैत्रिणीच्या वाढदिवसाहून परत येत होत्या. त्या वेळी ओळखीच्या मुलाने त्यांना थांबवून चॉकलेट आणि शीतपेय यातून गुंगीचे औषध दिले अन् नंतर ५ ते ६ जणांनी सामूहिक बलात्कार केला.
दोन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेल्या होत्या. तेथून परत येत असताना एकीच्या ओळखीचा मित्र भेटला… #Akola #CrimeNewshttps://t.co/02c2GkbjLb
— Lokmat (@lokmat) December 18, 2022
१४ आणि १६ वर्षीय दोन मुलींवर या नराधमांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.