पुन्हा आपल्या मुलींची श्रद्धा न होण्यासाठी पुणे येथे ‘लव्ह जिहाद-एक भयाण वास्तव’ या विषयावर कार्यक्रम !
पुणे – श्रद्धा वालकरच्या झालेल्या निर्घृण हत्येने आणि सामाजिक माध्यमावर अन् वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या वृत्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना घडल्यानंतर देणार्या प्रतिक्रियांपेक्षा अशा घटना घडूच नयेत; म्हणून नित्य काळजी घेणे आवश्यक आहे. आजूबाजूला अनेक आफताब असल्यामुळे मुलींना जागृत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लव्ह जिहाद या विषयावर माहिती देण्यासाठी ‘लव्ह जिहाद – एक भयाण वास्तव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता सनसिटी भाजी मंडई जवळ, आनंदनगर, सिंहगड रस्ता येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे सरचिटणीस दीपक नागपुरे, भाजपच्या नगरसेविका सौ. मंजुषा नागपुरे यांनी केले आहे. प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक श्री. नीलेश भिसे मार्गदर्शन करणार आहेत.
“लव जिहाद एक भयाण वास्तव”
सर्वांनी नक्की सहभागी व्हा…https://t.co/HN2AhYHZtU pic.twitter.com/dkGgTzt1Vv— Manjusha Deepak Nagpure (@MDNagpure) December 15, 2022
पीपीटी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून मुले आणि पालक यांना समजेल अशा पद्धतीने एका गंभीर विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात येणार आहे, तरी आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी, आपल्या परिसरात होणार्या या कार्यक्रमासाठी आजच नोंदणी करा, असे आवाहन दीपक नागपुरे यांनी केले आहे.