सोलापूर बंदमध्ये व्यापार्यांचा सहभाग !
सोलापूर – काही मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ १६ डिसेंबर या दिवशी येथे बंद पुकारला होता. दुपारी २ पर्यंत बंद पाळून त्यानंतर जनजीवन सुरळीत झाले. शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. बाजारपेठेतील व्यवहार सकाळी झाले नाहीत. शहरात पहाटेपासून पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवली होती.
या वेळी ‘राज्यपाल कोश्यारी चले जाव’च्या घोषणा देण्यात आल्या. बंदमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांनी सहभाग घेतला.