रिक्शा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्शाची तोडफोड !
८ जणांविरोधात गुन्हा नोंद !
पुणे – रिक्शा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न होता रिक्शातून प्रवासी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी रिक्शाची तोडफोड केली. कसबा पेठ येथील उदय शिर्के यांनी या घटनेची तक्रार प्रविष्ट केली आहे. ही घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली असून ८ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. विविध रिक्शा संघटनांनी दुचाकी कॅबच्या निषेधार्थ १२ डिसेंबर या दिवशी आर्.टी.ओ. कार्यालयासमोर आंदोलन केले होते.