वारकरी संप्रदायाकडून आज ‘ठाणे बंद’ची हाक !
|
ठाणे, १६ डिसेंबर (वार्ता.) – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे, तसेच दुपारी १२ वाजता येथील विठ्ठल मंदिर येथून एक निषेध फेरी काढण्यात येणार आहे.
या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, अखिल हिंदु समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. या विधानानंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यात उपनेत्या अंधारे यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे.
‘‘सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक दिली असून त्यास आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे’’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले. |
(सौजन्य : ABP MAJHA)
संत ज्ञानेश्वरांच्या विरोधातील वक्तव्याने समस्त वारकरी संप्रदायासह लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत ! – ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीरउद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून हेतूपुरस्सरपणे देवता, साधू-संत यांविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून विष ओकण्याचे काम केले जात आहे. आता संत ज्ञानेश्वरांच्या विरोधातील वक्तव्याने समस्त वारकरी संप्रदायासह लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी वारकरी संप्रदायाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक दिली आहे. |