सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते, तर हिंदु राष्ट्र झाले असते ! – कालीचरण महाराज
नगर येथे ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्चा
राज्यासह देशभरात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करा !
नगर – मुलींचे वशीकरण करतात, लव्ह जिहादचे ४० सहस्र खटले आहेत, देहलीत ३५ मुलींचे खटले आले आहेत. सर्व आतंकवादी मुसलमानच आहेत. ५ लाख मंदिरे पाडण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते, तर हिंदु राष्ट्र झाले असते, असे परखड मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने नगर येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा चालू झाला होता. ‘मुसलमानांना लहानपणापासून मदरशांत शिकवले जाते, तुम्हाला काय शिकवले जाते ?’ असा प्रश्नही कालीचरण महाराज यांनी या वेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुसलमानांवर विश्वास ठेवू नका’, असे म्हटले होते. प्रतिदिन १ लाख गोवंशियांची हत्या होते, हिंदु द्वेष करत नाहीत; मात्र हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण होत आहे. आपण परकीय लोकांना सहन करू शकत नाही; पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे, तर सर्व हिंदूंचे राजे होते, हे विसरून चालणार नाही.
या मोर्च्यात भाजप, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदुराष्ट्र सेना, विश्व हिंदु परिषद अशा अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्च्यास प्रारंभ झाला. या वेळी जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देण्यात आल्या.