(म्हणे) ‘विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध !’ – हुसेन दलवाई, काँग्रेस
मुंबई – महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन सरकार महिलांप्रती काळा कायदा आणू इच्छिते. विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करण्याचा सरकारचा हेतू आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली.
विवाह समन्वय समितीवरून हुसेन दलवाईंचा सरकारवर मोठा आरोप, कडाडून विरोध करत म्हणाले…https://t.co/kZTo6B6vXI #interfaithmarriage #husaindalwai https://t.co/SlumiNfqxR
— Maharashtra Times (@mataonline) December 15, 2022
या वेळी हुसेद दलवाई म्हणाले,
१. कुणी तक्रार करत नाही, तोपर्यंत असा हस्तक्षेप करणे म्हणजे ‘फॅसिस्ट’ कृती असून घटनाविरोधी आहे. (अनेक प्रकरणांत तक्रारी येऊनही पोलिसांनी लव्ह जिहादच्या घटनेत कारवाई केलेली नाही किंवा मुलगी सज्ञान असल्याने कायद्याने कारवाई होऊ शकत नाही. मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर कोण तक्रार करायला पुढे येणार आहे ? लव्ह जिहाद रोखणारी समिती हुसेन यांना ‘फॅसिस्ट’ वाटते; पण लव्ह जिहादची कृती आतंकवादी षड्यंत्राचा एक भाग आहे, असे वाटत नाही ! – संपादक)
२. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह जाती निर्मूलनाचा उपाय असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. (असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे ! – संपादक)
३. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणार्यांना संरक्षण देण्याऐवजी ‘नवर्याने फूस लावून पळवले’, अशा तक्रारी करणार्या आई-वडिलांना साहाय्य करणे, हा या समितीचा हेतू असल्याचे दिसते. (मुसलमान मुलेच फूस लावण्यासाठी कसे पैसे पुरवले जातात, हे सांगतात. त्यामुळे ‘मुसलमान मुलांनी हिंदु मुलींना फूस लावून पळवलेले असते’, हेच सत्य असल्याने हुसेन दलवाई यांना पोटशूळ उठला आहे ! – संपादक)
हे वाचा –
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह यांविषयी माहिती घेण्यासाठी समितीचे गठन !
https://sanatanprabhat.org/marathi/636102.html
संपादकीय भूमिका
|