लालबाग (मुंबई)मधील इमारतीला भीषण आग !
मुंबई – येथील लालबागमधील ‘अविघ्न पार्क टॉवर’ नावाच्या इमारतीला भीषण आग लागली. करी रोड रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या या ६१ मजली इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर ही आग लागली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आग लागल्यावर इमारतीमधील नागरिकांना त्वरित बाहेर काढण्यात आल्याने मनुष्यहानी टळली. वर्ष २०२१ मध्ये याच सोसायटीतील इमारतीला आग लागली होती. या वेळी एका व्यक्तीचा इमारतीमधून पडून मृत्यू झाला होता.