…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !
तवांगमध्ये भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना चोप दिल्याचे प्रकरण
भारताच्या डावपेचात्मक गुप्तहेर यंत्रणेत काही न्यून आहे का ? चीनच्या हिवाळ्यात होणार्या लष्कराच्या सरावाकडे भारतीय लष्कराने डोळेझाक का केली ? एप्रिल २०२२ मध्ये चीनने लडाखमधील भारताची भूमी बळकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर या हिमालयीन प्रदेशामध्ये याविषयीची काही बातमी प्रसिद्ध झालेली नाही; परंतु ठराविक कालावधीनंतर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये होणार्या चकमकी उदा. तिबेट-अरुणाचल सीमारेषेवरील चकमक ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक घायाळ झाले. हे पहाता भारताला मोठा धोका आहे, हे यातून अधोरेखित होते. तवांगच्या सीमारेषेवर भारतीय सैन्याची प्रतिकार करण्याची क्षमता सर्वांत अधिक आहे. तरीही ‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.
– प्रा. ब्रह्मा चेल्लानी, सामरिक प्रकरणांचे विश्लेषक
(प्रा. ब्रह्मा चेल्लानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या केंद्रात ‘स्ट्रेटेजिक स्टडीज’ (धोरणात्मक अभ्यास) या विषयाचे प्राध्यापक आहेत.) (१३.१२.२०२२)