भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही ! – जर्मनी
नवी देहली – विकास, लोकसंख्या आणि अन्य गोष्टींकडे पहाता भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही, असे विधान भारतातील जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत केले.
जर्मन राजदूत फिलिप एकरमैन ने कहा भारत के अलावा कोई अन्य देश नहीं है जो चीन का मुकाबला कर सके https://t.co/d5V9rC5TOZ
— AajTak (@aajtak) December 15, 2022
१. एकरमॅन म्हणाले की, अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेला संघर्ष, हा चिंतेचा विषय आहे. तेथे आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन होऊ नये. भारत आणि जर्मनी दोघेही एकमेकांशी चीन अन् रशिया यांच्या संदर्भातील सूत्रांवरून संपर्कात आहोत.
२. एकरमॅन व्यापारविषयी म्हणाले की, व्यापाराची गोष्ट येते, तेव्हा सर्व जण मलेशिया आणि व्हिएतनाम यांच्याकडे पहातात. मला कळत नाही की, ते असे का करत आहेत ? कदाचित् यामागे भारतात नियमांच्या संदर्भात समस्या असू शकतात किंवा संरक्षणाचा विषय असू शकतो. जर्मनी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आम्हाला अन्य देशांशीही व्यापार करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भारत जितका आमच्या प्राधान्यामध्ये असला पाहिजे, तितका तो नाही.