मोरोक्को पराभूत झाल्यानंतर धर्मांधांकडून बेल्जियममध्ये हिंसाचार !
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा
ब्रुसेल्स (बेल्जियम) – ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्या उपांत्य सामन्यामध्ये फ्रान्सने मोरोक्कोचा २-० अशा गोलफरकाने पराभव केल्यानंतर बेल्जियममध्ये हिंसाचार झाला. मोरक्कन संघाच्या १०० हून अधिक धर्मांध चाहत्यांनी ब्रुसेल्समध्ये दंगलनियंत्रण विभागातील पोलिसांवर आक्रमण केले. अंगाला मोरोक्कोचे झेंडे गुंडाळून आलेल्या या चाहत्यांनी ब्रुसेल्समधील दक्षिण स्थानक येथे हा धुडगूस घातला. आक्रमकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा आणि अश्रूधुराचा मारा केला. (युरोपातील तथाकथित सुसंस्कृत लोक विद्ध्वंसक आहेत, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)
Morocco fans clash with police in Brussels after defeat in World Cup semi-final vs France https://t.co/qLBA014xwa
— Republic (@republic) December 15, 2022
फ्रान्समध्ये धर्मांधांकडून हिंसाचार !
मोरोक्कोच्या विरोधातील सामना फ्रान्सने जिंकल्यानंतर तेथील नागरिकांनी विविध ठिकाणी जल्लोष केला. त्या वेळी इस्लामी देश मोरोक्को पराभूत झाल्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी जल्लोष करणार्या फ्रेंच नागरिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. फ्रान्समध्ये साधारणा १ लाखाच्या वर मोरोक्को येथील शरणार्थी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे मोरोक्कोच्या विरोधातील सामना जिंकल्यानंतर फ्रान्समध्ये ठिकठिकाणी हिंसक परिस्थिती निर्माण झाली. (मुसलमान जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी त्यांच्यासाठी धर्म हा प्राधान्य असतो. त्यामुळे त्यांना कुणीही आश्रय दिला, तरीही संबंधित देशाने केलेल्या उपकाराचे भान न ठेवता ते त्यांच्या देशात स्वतःची वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न करतात. युरोपमध्ये धर्मांधांनी घडवून आणलेल्या हिंसाचारामागे हेच प्रमुख कारण आहे ! – संपादक)