सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेची मागणी !
देहू (जिल्हा पुणे) – समाजात संत आणि देवता यांचे विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे, लक्ष्मण शेरकर आदी उपस्थित होते.