हे प्रशासनाला लज्जास्पद ! पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना शिवीगाळ करणार्यावर सरकारने स्वतःहून कारवाई का केली नाही ?
सीतापूर (उत्तरप्रदेश) येथील खानापूर सादात गावाचा सरपंच सत्तार याला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या विधानांचा एक ऑडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. अंकित नावाच्या तरुणाने तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सत्तार याला अटक करण्यात आली.’ (९.१२.२०२२)