राज्यपालांना विश्वविद्यालयाचे कुलपती बनवण्याच्या कायद्यात केरळ सरकारकडून पालट !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या विधानसभेमध्ये विश्वविद्यालय कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले. यामुळे आता राज्यातील विश्वविद्यालयांमध्ये कुलपती म्हणून राज्यपालांऐवजी अन्य व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे. राज्याचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी, तसेच विधानसभेतील विरोधी पक्ष असलेल्या ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ने यास विरोध केला होता.