सिवानमध्ये मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीशी केला विवाह
बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
सिवान (बिहार) – जिल्ह्यातील निराला नगर परिसरात ‘लव्ह जिहाद’ची घटना समोर आली आहे. येथील एका मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी विवाह केला.
आरोपी तरुण येथे एक शिकवणी केंद्र चालवत होता. पीडित मुलगी या केंद्रात शिकवणीसाठी जात होती. पीडित मुलीची शिकवणी पूर्ण झाल्यानंतर आरोपी तरुणाने तिला शिकवणी केंद्रात कर्मचारी म्हणून नियुक्त केले. तो तरुण स्वत:ची खरी ओळख लपवून समीर खन्ना असल्याचे सांगत होता. तसेच तो हिंदूंप्रमाणे मनगटावर पवित्र धागाही बांधत असत. पीडित मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी विवाह केला. विवाहसोहळा पार पडल्यानंतर त्याची खरी ओळख उघड झाली. सिवानचे पोलीस अधीक्षक शैलेश कुमार यांनी या घटनेची नोंद घेऊन अन्वेषण करण्याचा आदेश दिला.