‘ब्रेकफास्ट (सकाळी अल्पाहार करणे)’ ही आपली संस्कृती नव्हे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १११
‘सकाळी उठल्या उठल्या व्यायाम न करता चहा घेणे किंवा अल्पाहार करणे’, ही आपली संस्कृती नव्हे. खाल्लेले नीट पचण्यासाठी पोटातील अग्नी (पचनशक्ती) चांगला पेटलेला पाहिजे. केवळ भूक लागणे, म्हणजे अग्नी पेटलेला आहे, असे समजू नये. सूर्य वर येऊन आजूबाजूचे दव निघून गेल्यानंतरच ज्याप्रमाणे पालापाचोळा सहजपणे जाळता येतो, त्याप्रमाणे सूर्य वर आल्यावर अन्नही चांगले पचते. यामुळे अल्पाहार न करता सकाळी ११ नंतर चांगली भूक लागेल तेव्हा थेट जेवलेलेच चांगले.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०२२)