देहलीमध्ये १७ वर्षीय मुलीवर आम्ल फेकले !
एका आरोपीला अटक
नवी देहली – येथील द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर दिवसाढवळ्या आम्ल फेकण्यात आले. दुचाकी वाहनावरून आलेल्या दोन आरोपींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने या मुलीवर आम्ल फेकले. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. पीडित मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिचा तोंडवळा भाजला आहे. तिच्या डोळ्यातही आम्ल गेले आहे. तिने आरोपींची नावे सांगितल्यावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
BREAKING NEWS | दिल्ली में छात्रा पर एसिड अटैक, एक आरोपी हिरासत में दूसरे की तलाश तेज@romanaisarkhan | @varunjainNEWS https://t.co/p8nVQWGCTx #BreakingNews #AcidAttack #DelhiAcidAttack pic.twitter.com/kCok5BgFOD
— ABP News (@ABPNews) December 14, 2022
संपादकीय भूमिका
|