शाहरुख खान यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ बोल असणार्या गाण्यात अभिनेत्रीने परिधान केले भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र !
हिंदु महासभेकडून टीका !
नवी देहली – अभिनेते शाहरुख खान यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी भगव्या रंगाची बिकीनी (अंतर्वस्त्र) परिधान केली आहे. या गाण्याचे बोल ‘बेशरम रंग’ असे आहेत. त्यामुळे यावर हिंदु महासभेने आक्षेप घेतला आहे. हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे की, ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे.
#SRK will be releasing his film ‘Pathan’ shortly. Listen to this short speech by #YogiAdityanath ji.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳#BoycottBollywood #BoycottPathan #BoycottbollywoodForever #Boycott pic.twitter.com/8Ja2776n9r— Rahul Acharya (@Rahul__Acharya) December 3, 2022
याखेरीज या चित्रपटावर दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनीही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. ‘बेशरम रंग’ हे गाणे ‘मकीबा’ या गाण्यावरून चोरले आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे.
शाहरुख खान की फिल्म “पठान” का , मैं पूर्ण बहिष्कार करता हूं, क्या आप भी फिल्म फ्लॉप करवाने में सहयोग करेंगे, तो Yes लिखकर समर्थन करें ???
Rt must…. pic.twitter.com/hfNLNtgvhQ— Ajit Doval 🇮🇳 (@TheAjitDovalIND) December 13, 2022
सामाजिक माध्यमांतून या गाण्याची खिल्ली उडवली जात आहे.