कर्नाटकात दलितांची फसवणूक करून धर्मांतर करणार्या पाद्य्राला त्याच्या पत्नीसह अटक !
-
हिंदु देवतांच्या मूर्ती फेकल्या !
-
पाद्य्राच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
बेंगळुरू – बेल्लारी भागात दलितांना फसवून त्यांचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी आरोपी पाद्री सॅम्युअल याला आणि त्याच्या पत्नीसह कोप्पल येथून अटक करण्यात आली. याखेरीज या पाद्य्राच्या १७ वर्षांच्या मुलावर मागास समाजातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यालाही कह्यात घेऊन बेल्लारी येथील सुधारगृहात पाठवले आहे.
एका वृत्तानुसार, पाद्री सॅम्युअल हा लोकांना फसवून आणि प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर करत होता. परिसरातील दलित समाजातील एका व्यक्तीने सदर पाद्य्राच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या पाद्य्राने परिसरातील दलितांना प्रार्थनागृहात येऊन ‘बाप्तिस्मा’ (धर्मांतराच्या कार्यक्रमाचा एक प्रकार) घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. सदर पाद्य्राच्या पत्नीवर दलित मुलांना चर्चमध्ये नेण्याचा आणि त्यांना चर्चच्या कामात गुंतवल्याचा आरोप आहे.
#BreakingNews | Conversion in Koppal, Karnataka, pastor allegedly converted after promising money; forcefully baptized. @Aksharadm6 with the details
Join the broadcast with @toyasingh | #Karnataka pic.twitter.com/WssLxJqn5X
— News18 (@CNNnews18) December 13, 2022
(म्हणे) ‘हिंदु देवतांची पूजा केली, तर तुम्हाला दुष्ट शक्ती त्रास देतील ! – पाद्य्राचा हिंदूंना घाबरवण्याचा प्रकारदलितांच्या म्हणण्यानुसार, त्यांना हिंदु देेवतांची पूजा न करण्याची चेतावणी देण्यात आली होती. धर्मांतरानंतर दलितांच्या घरातून हिंदु देवतांची प्रतिमा आणि मूर्ती कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. दलितांना सांगण्यात आले की, त्यांनी हिंदु देवतांची पूजा केली, तर त्यांना दुष्ट शक्ती त्रास देतील. (हिंदु देवतांचा अवमान करणार्यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे ! आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ? – संपादक) |
संपादकीय भूमिका
|