‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात तात्काळ कायदा करा !
|
लांजा (जि. रत्नागिरी) – श्रद्धा वालकर या हिंदु युवतीचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या करणार्या देहलीतील आफताब पूनावाला या जिहाद्याला तात्काळ फासावर लटकवावे, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असे ‘लव्ह जिहाद विरोधी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे करावेत, अशा मागणीचे निवेदन येथील ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने १३ डिसेंबर या दिवशी प्रशासनाला देण्यात आले. हे निवेदन येथील नायब तहसीलदार सौ. उज्ज्वला केळुसकर यांनी स्वीकारले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळातील सौ. भक्ती महाजन, सौ. सुजाता देसाई, सौ. तन्वी लोटणकर, श्री. अशोक चांगण आणि डॉ. समीर घोरपडे हे उपस्थित होते.