भिवंडी येथे ‘ए.टी.एम्.’ यंत्र फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
‘ए.टी.एम्.’ यंत्राच्या सुरक्षेची ऐशीतैशी !
ठाणे, १३ डिसेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील पूर्णा परिसरातील एका खासगी अधिकोषाचे ‘ए.टी.एम्.’ यंत्र गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आले. चोरांनी किती रक्कम चोरली, याचा आकडा समजलेला नाही. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळीच या यंत्रात २६ लाख रुपये भरण्यात आले होते.