मांढरदेव (सातारा) येथील काळूबाई मंदिरात रक्कम मोजणार्या निवृत्त बँक कर्मचार्यानेच चोरले दीड लाख रुपये आणि दागिने !
सातारा – मांढरदेव (तालुका वाई) येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजणार्या निवृत्त बँक कर्मचार्यानेच दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने यांची चोरी केली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संबंधित कर्मचार्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हा प्रकार किती मासांपासून चालू होता ? आतापर्यंत किती रकमेचा अपहार झाला आहे ? यामध्ये कुणी ट्रस्टचे कर्मचारी सामील आहेत का ? याची चौकशी चालू आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश असल्याने आणि ट्रस्टचे प्रशासकीय विश्वस्त म्हणून वरिष्ठ अधिकारी असल्याने माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. (माहिती देण्यास टाळाटाळ करणार्या पोलिसांवरच कारवाई करायला हवी, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) याविषयी ट्रस्टकडून माहिती घेण्याविषयी सांगितले जात आहे; मात्र ट्रस्टच्या अधिकार्यांचे दूरभाष बंद असून संपर्क होत नसल्याने या प्रकरणाविषयी अधिक माहिती मिळण्यात अडचण येत आहे.
श्री काळूबाईदेवीला भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देतात. या देणगीची मोजणी प्रतिमास खासगी व्यक्तीकडून केली जाते. १२ डिसेंबर या दिवशी दानपेटीतील रक्कम आणि दानपेटीत टाकलेले दागिने यांची मोजणी ट्रस्टी, तसेच ट्रस्टचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत खासगी व्यक्ती अन् अधिकोषाचे निवृत्त कर्मचारी यांच्याकडून चालू होती, त्या वेळी हे उघड झाले.
संपादकीय भूमिकाहे आहेत भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्यांकडे मंदिरांचे दायित्व दिल्याचे दुष्परिणाम ! भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा अपहार होणे, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत, तसेच दोषींवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी ! |