नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना फासावर लटकवा !
|
निपाणी (कर्नाटक) – वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला अन् सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी १३ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता बसस्थानकाजवळ असलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, ‘सद्गुरु तायक्वांदो ॲकॅडमी’चे संस्थापक श्री. बबन निर्मळे, सनातन संस्थेच्या श्रीमती अलका पाटील, तसेच श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके यांनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनासाठी निपाणी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. नीता बागडे, भाजपचे नगरसेवक श्री. संतोष सांगावकर, माजी नगरसेवक श्री. विजय टवळे, भाजपचे श्री. रवी इंगवले आणि श्री. शांतीनाथ मुतुकडे, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, इस्कॉनचे श्री. शिवाजी आजरेकर आणि श्री. उदय मोरे, वाल्मिकी समाजाचे श्री. बाळू तराळ, श्रीराम सेनेचे श्री. राजू कोपर्डे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनिल बुडके, योगेश चौगुले, गौतमेश तोरस्कर उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले.
क्षणचित्रे
१. गळतगा या गावातील प्रशिक्षणवर्गातील युवक, तसेच नांगनूर, जत्राट या गावांतून धर्मप्रेमी आंदोलनाला उपस्थित होते.
२. आंदोलन चालू असतांना अनेक जण चौकात थांबून विषय ऐकत होते.