प्रेमळ आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !
‘६.११.२०२२ या दिवशी श्रीमती भारती पालन यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. मला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. प्रेमळ स्वभाव
पालनकाकू साधकांच्या वाढदिवसाच्या दिवशी संबंधित साधकांना स्वतःजवळ असलेला खाऊ देतात आणि त्यांना प्रेमाने जवळ घेतात.
२. सेवाभाव
त्या धान्य निवडण्याची सेवा एकाग्रतेने करतात. त्यांनी निवडलेले धान्य पुन्हा निवडावे लागत नाही. त्यांना कोणतीही सेवा दिली, तरी त्या ती सेवा लगेच स्वीकारतात.
३. साधनेचे गांभीर्य
काकूंची बोलीभाषा तुळू असल्याने त्यांना मराठीतून लिहायला येत नाही. त्यामुळे त्या त्यांच्याकडून दिवसभर झालेली सेवा आणि त्यांची दैनंदिनी मुलगी कु. योगिता हिच्याकडून लिहून घेतात अन् ती उत्तरदायी साधकाला दाखवतात.
४. चुकांविषयी संवेदनशील
एकदा मी त्यांना त्यांची चूक सांगितली. तेव्हा त्यांनी ती लगेच स्वीकारली आणि क्षमायाचना केली.
‘पालन काकूंमधील गुण आमच्यातही येऊ देत’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते.’
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२२)