भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी ! – जागतिक माध्यमांचे वृत्त

नवी देहली – अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचे वृत्त जागातिक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. यात त्यांनी भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी झाल्याचे म्हटले आहे.

१. हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले. भारत आणि अमेरिका येथील चीनच्या दूतावासाने या संघर्षाविषयी मौन बाळगले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही.

२. बीबीसीने म्हटले की, या संघर्षात भारतापेक्षा चिनी सैनिकांची अधिक हानी झाली आहे.

३. जर्मनीमधील ‘डी.डब्लू.’ने वृत्तसंस्था आणि भारतीय सैन्य यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत वृत्त दिले आहे. यात त्यांनी ‘चिनी सैनिक सीमेच्या अगदी जवळ आले होते. यानंतर भारतीय सैनिकांनी यावर प्रतिक्रिया दिली, असे म्हटले आहे.

४. पाकिस्तानमधील ‘डॉन’ने औली येथे अमेरिकेसमवेत झालेल्या सैनिकी सरावाला चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचे कारण सांगण्यात आले आहे. यात दोन्ही बाजूंचे काही सैनिक घायाळ झाले आहेत, असे म्हटले आहे.