जमशेदपूर (झारखंड) येथील गुरुद्वारामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणारे भित्तीपत्रक प्रसारित
भारतीय सैन्याला ‘हिंदुत्व आतंकवादी’ म्हटले !
जमशेदपूर (झारखंड) – येथील मानगो गुरुद्वारामध्ये भित्तीपत्रक लावण्यात आले आहेत. यात भारतीय सैन्याला ‘हिंदुत्व आतंकवादी’ संबोधण्यात आले आहे. भारतीय वायूदल आणि नौदल यांना ‘सहस्रो शिखांची हत्या करणारे’ असे म्हटले आहे. यात खलिस्तानी आतंकवादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले याचे छायाचित्र आहे. त्याखाली ‘महान शहीद’ असे लिहिण्यात आले आहे. यासह जनरल शाबेग सिंह, भाई केहर सिंह, भाई सतवंत सिंह, जगतार सिंह हवारा, बलवंत सिंह राजोआना, दविंदर पाल सिंह भुल्लर, दिलावर सिंह बब्बर आदी खलिस्तानी आतंकवाद्यांचीही नाव आहेत. या प्रकरणी पोलिसांकडे काहीही माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (झोपलेले झारखंड पोलीस ! असे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे कधी तरी रक्षण करू शकतील का ? – संपादक)
‘भारतीय सेना हिंदुत्व आतंकवादी, नेवी-एयरफोर्स ने हजारों सिखों को मारा-हमारे धर्मस्थल बर्बाद किए’: झारखंड के गुरुद्वारा में पोस्टर#Jharkhand #Sikh #Gurudwara #IndianArmyhttps://t.co/FGTZSPXohr
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 13, 2022
विश्व हिंदु परिषदेच्या विरोधानंतरही गुरुद्वाराकडून भित्तीपत्रक काढण्यास नकार !
याविषयी विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्य प्रचार-प्रसार प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले की, या भित्तीपत्रकाला विरोध करण्यात आला आहे. याविषयी गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाला सांगूनही त्यांनी भित्तीपत्रक काढण्यास नकार दिला. या भित्तीपत्रकाविषयी स्थानिक प्रशासनालाही माहिती आहे; मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात ओली नाही. पोलिसांनीही कारवाई केलेली नाही.
‘झारखंड गुरुद्वारा प्रबंध कमेटी’च्या अध्यक्षाकडून खलिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थन !
‘झारखंड गुरुद्वारा प्रबंध कमेटी’चे अध्यक्ष सरदार शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याला शीख समाज ‘हुतात्मा’ समजतो. तुमच्या दृष्टीने तो आतंकवादी असेल; मात्र शिखांच्या दृष्टीने नाही. आज-काल त्याची छायाचित्रे बाजारात मिळतात. त्याला अन्य शेकडो हुतात्म्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकापंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांची कीड आता अन्य राज्यांतही पसरू लागली आहे. याचा मोठा परिणाम भोगायला लागण्यापूर्वीच अशा प्रवृत्तीला ठेचायला हवे ! |