नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे विधान करणारे काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांंना अटक
दामोह (मध्यप्रदेश) – ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा’, अशी चिथावणी दिल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली.
Congress leader Raja Pateria arrested in Madhya Pradesh.
(@akshaydongare_)#ITVideo #RajaPateria pic.twitter.com/7Gi7kKVFQD— IndiaToday (@IndiaToday) December 13, 2022
पटेरिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होताच त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा हत्या किंवा हिंसा यांवर विश्वास नाही. मला माझ्या वक्तव्यातून ‘मोदी यांचा पराभव करावा लागेल’, असे सांगायचे होते.