श्री. प्रकाश मराठे यांचा सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

श्री. प्रकाश मराठे

‘दिवाळीच्या दिवशी रामनाथी आश्रमातील श्री. प्रकाश मराठेकाका (वय ७८ वर्षे) मला भेटायला आले. ते मला म्हणाले, ‘‘बाहेर लोकांना संतांच्या दर्शनासाठी रांगा लावाव्या लागतात. सनातनच्या साधकांना किती सहजपणे संतांचे दर्शन घडते.’’ त्यांनी मला भेटवस्तूही दिली. त्यांच्या डोळ्यांत भाव जाणवत होता. मी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. माझ्यापेक्षा वयाने आणि साधनेतील अनुभवाने मोठे असूनही तेही वाकून मला नमस्कार करू पहात होते. मी त्यांना नमस्कार करू न देता म्हटले, ‘‘तुमचा भाव आणि लीनता यांमुळे तुमची अध्यात्मात प्रगती झाली आहे आणि पुढेही होणार आहे.’’ (श्री. प्रकाश मराठेकाका यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आहे.)

पू. संदीप आळशी

वरील प्रसंगावरून ‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’

– (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२९.१०.२०२२)