मुंबई आणि उपनगर यांमध्ये दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी सुटी घोषित !
मुंबई – मुंबई आणि उपनगर यांमध्ये राज्यशासनाने दहीहंडी (७ सप्टेंबर २०२३) आणि अनंत चतुर्दशी (२८ सप्टेंबर २०२३) या दिवशी स्थानिक सुटी घोषित केली आहे. राज्यशासनाच्या सामान्य विभागाकडून १२ डिसेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश निर्गमित केला आहे. मुंबई आणि उपनगर यांमधील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसाठी ही सुटी असणार आहे.