उत्तरदायी साधकांनी गुरुकार्यासाठी साधकांनी घेतलेल्या ध्येयाची पूर्ती करतांना त्यांना येणार्या अडचणींचाही विचार करावा !
‘प्रसारातील साधक ‘सनातन वही’, तसेच ‘सनातन पंचांग’ यांचे वितरण करणे, विज्ञापने घेणे’ इत्यादी सेवा ध्येय ठेवून तळमळीने करत असतात. सेवेचे ध्येय निश्चित केल्यावर साधक त्यात येणार्या अडचणी, पालटणारी परिस्थिती, तसेच आजारपण इत्यादींना सामोरे जाऊन ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत असतात. ध्येय समयमर्यादेत पूर्ण होण्याच्या अनुषंगाने उत्तरदायी साधक त्या संदर्भात त्यांचा पाठपुरावाही घेतात.
‘काही वेळा साधक आजारी असतांना किंवा त्यांना अन्य अडचणी असतांना उत्तरदायी साधक ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांचा आढावा घेतात’, असे लक्षात येते. अशा वेळी उत्तरदायी साधकांनी तारतम्याने परिस्थिती हाताळणे आणि साधकांची स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. यापुढे ध्येयाची पूर्तता करण्यात साधकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या उत्तरदायी साधकांना मनमोकळेपणाने सांगावे, तसेच ध्येयपूर्ती करतांना त्यामध्ये साधकांना मात न करण्यासारखी अडचण आल्यास उत्तरदायी साधकांनी साधकांच्या स्थितीनुरूप सेवांचे पुन्हा नियोजन करावे.
‘साधकांनो, कार्याच्या समवेत साधकांचाही विचार करून ‘प्रीती’ हा आध्यात्मिक गुण अंगी बाणवल्यास गुरुकृपा लवकर होते’, हे लक्षात घ्या !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२२)