राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात पुणे येथे आज बंदची हाक !
पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. राज्यपालांना काढून टाकावे आणि भाजपने महाराष्ट्राची क्षमा मागावी, या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गटही या बंदमध्ये सहभागी होणार आहे. या बंदला पुण्यातील व्यापार्यांनीही पाठिंबा दिला आहे. पुण्यातील दुकानेही दुपारी ३ पर्यंत बंद रहाणार आहेत.
एस्.एस्.पी.एम्. महाविद्यालयातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ राज्यातील विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांची बैठक झाली होती. शिवप्रेमींनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीनंतर करण्यात आले आहे.