सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून योग्य निर्णय घेणारी पुणे येथील बालसाधिका कु. सुकृता कांडलकर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून योग्य निर्णय घेणारी पुणे येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. सुकृता कांडलकर (वय १२ वर्षे) !
‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. सुकृता कांडलकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची ५१ टक्के पातळीची आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५२ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.१०.२०२२) |
१. शाळेतील कार्यक्रमात सहभागी झाल्यावर ५ गुण वाढीव मिळणार असल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरवणे
‘दळणवळण बंदीनंतर शाळा प्रत्यक्ष चालू झाल्याने शाळेने काही कार्यक्रम आयोजित केले होते. एकदा शाळेत ‘मराठी मंडळ’, हा कार्यक्रम होता. वर्गशिक्षिकेने सांगितले, ‘‘या कार्यक्रमात सहभागी होणार्या विद्यार्थ्याला परीक्षेत ५ गुण वाढवून मिळणार आहेत.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला सहभागी व्हायचे आहे.’’
२. योग्य निर्णय घेता येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे
मी घरी आल्यावर आईला शाळेतील कार्यक्रमाबद्दल सांगितले. तेव्हा शाळेतील कार्यक्रमाच्या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचे साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठी शिबिर असल्याचे मला समजले. दळणवळण बंदीनंतर प्रथमच प्रत्यक्ष शिबिर होणार होते. त्यामुळे मला शिबिराला जायचे होते आणि शाळेतील कार्यक्रमामध्येही भाग घ्यायचा होता. तेव्हा मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘हा निर्णय घेण्यासाठी तुम्हीच मला साहाय्य करा.’
३. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगितलेले सूत्र आठवल्यावर ५ गुणांपेक्षा सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे वाटणे
तेव्हा ‘आपल्याला कुठल्या प्रसंगात निर्णय घ्यायला जमत नसेल, तर आपल्याला अमुक एखादी गोष्ट हवी कि श्रीकृष्ण हवा ?’, असा विचार केल्याने आपल्याला त्याचे उत्तर आपोआप मिळते’, हे व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगितलेले सूत्र मला आठवले. अशा प्रकारे प्रयत्न केल्यावर ‘मला ५ गुण हवेत कि सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन हवे ?’ या प्रश्नावर ‘सद्गुरु स्वातीताई हव्या आहेत’, असे मला उत्तर मिळाले. त्या वेळी मला ५ गुणांपेक्षा सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे वाटले आणि मी शिबिराला जाण्याचे ठरवले.
४. शाळेतील कार्यक्रमाच्या दिवसामध्ये पालट होणे आणि कार्यक्रमात सहभागी होता येणे
दुसर्या दिवशी शाळेत गेल्यावर मी वर्गशिक्षिकेला सांगितले, ‘‘मला बाहेर जायचे असल्यामुळे शाळेतील कार्यक्रमाला येता येणार नाही. तुम्ही दुसर्या मुलीला घ्या.’’ मी ठरल्याप्रमाणे शिबिराला गेले. नंतर शाळेच्या निर्णयात पालट होऊन कार्यक्रम काही दिवसांनी होणार असल्याचे कळले. गुरुदेवांच्या कृपेने मला कार्यक्रमातही सहभागी होता आले.
‘मला शिबिर आणि शाळेतील कार्यक्रम दोन्हीचा लाभ घेता आला’, याबद्दल श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. सुकृता कांडलकर, पुणे (११.४.२०२२)