वीरशैव लिंगायत हा हिंदु धर्मातीलच एक पंथ ! – काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी
सोलापूर – वीरशैव लिंगायत हा हिंदु धर्मातीलच एक पंथ आहे. हिंदु धर्म वटवृक्षासारखा आहे. हिंदु धर्माच्या अनेक शाखा आहेत. त्यातील एक शाखा म्हणजे वीरशैव लिंगायत पंथ आहे. वीरशैव लिंगायत पंथ हिंदु धर्मापासून वेगळा नाही, असे प्रतिपादन काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समारोप सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक (डॉ.) मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोलापूर येथील होटगी मठामध्ये करण्यात आले होते.