रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले अभिप्राय
१. आश्रमात परमेश्वर वास करत असल्याची अनुभूती घेतली !
‘मी पहिल्यांदाच आश्रमात आलो आहे. इथे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली आहे. मी येथे परमेश्वर वास करत असल्याची अनुभूती घेतली. मला येथे चैतन्य जाणवले.’
– श्री. कृष्णात आनंदा पोवार (माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना), करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)
२. ‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम पाहून समजले !
‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम बघून मला समजले. येथे मला पुष्कळ ऊर्जा मिळाली.’
– श्री. राजू बापूसो यादव, (करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना), करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)
३. ‘आश्रम पहाण्यापूर्वी मला निरुत्साह वाटत होता; पण आश्रम पहातांना प्रसन्नता जाणवली.’
– श्री. शरद आनंदराव माळी, कोल्हापूर (१६.६.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |