मुंबईमध्ये पत्रकार वरूण सिंह यांना मुसलमान ‘ओला’ चालकाकडून मारहाण !
मुंबई – ‘स्क्वेअर फीट इंडिया’चे संस्थापक आणि पत्रकार वरूण सिंह यांनी परवेझ खान या ‘ओला’ चालकाने त्यांना मारहाण केल्याची माहिती ‘ट्वीट’द्वारे प्रसारित केली आहे. ऑनलाईन पैसे देण्याऐवजी परवेझ याने रोख स्वरूपात पैशांची मागणी केली होती. या वेळी झालेल्या वादातून परवेझ याने मारहाण केल्याचा आरोप वरूण सिंह यांनी केला. याविषयी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आल्याचे सिंह यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे. वादामागील नेमके कारण समजलेले नाही.
१. ९ डिसेंबरला रात्री परळ येथील फिनिक्स मॉल येथून अन्यत्र जाण्यासाठी वरूण सिंह यांनी ओला गाडी नोंदवली. परवेझ खान गाडी घेऊन आला.
२. या वेळी सिंह यांनी ओला गाडी रहित केली, तेव्हा परवेझ याने त्यांचे चित्रीकरण केले. वरुण यांनीही मग त्याचे चित्रीकरण केले.
३. सिंह यांनी चित्रीकरण थांबवले; पण परवेझ याने त्यांना ठोसा देऊन मारहाण केली, तसेच शिरस्त्राणाने (हेल्मेटने) डोक्यावर प्रहार केला. या वेळी परवेझ याने त्यांना मारण्याची धमकीही दिली.
४. ‘आजूबाजूचे लोक जमल्यामुळे परवेझ याने पलायन केले’, असा आरोप वरूण सिंह यांनी ‘ट्वीट’मध्ये केला आहे. ‘माझी अहिंसक वृत्ती आणि सभ्यता माझा कमकुवतपणा मानला जात आहे. मी कायद्याचा आदर करतो. माझ्यासमवेत जे घडले, ते चुकीचे आहे’, असेही वरूण सिंह यांनी ‘ट्वीट’ मध्ये म्हटले आहे.
संपादकीय भूमिकास्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःच सक्षम होणे, ही काळाची आवश्यकता आहे ! |