राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे ‘चांगले किंवा वाईट’, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकचे नाव न घेता त्याला फटकारले
न्यूयॉर्क (अमेरिका) – राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे. अशा प्रकारचे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.
सध्या भारत १५ देशांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे. ही परिषद येत्या १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सुधारित बहुपक्षवाद आणि आतंकवाद यांना विरोध’ यावर कार्यक्रम आयोजित करणार आहे. तत्पूर्वी भारताकडून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांना पत्र लिहिले आहे. त्यात भारताने वरील विधान केले आहे.