जामीन अर्जावरील सुनावणी १० मिनिटांत आटोपली पाहिजे !
सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण मत
नवी देहली – जामीन अर्जांवर अनेक दिवस ‘तारीख पे तारीख’चे सत्र चालू रहाते. ही दीर्घ सुनावणी म्हणजे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. जामीन अर्जांची सुनावणी १० मिनिटांच्या पुढे जाता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी सुनावणी करतांना म्हटले आहे. जामीन अर्जांवर वेळीच निर्णय होत नसल्यामुळे देशभरातील कारागृहांत कच्च्या बंदीवानांची (ज्यांचा खटला चालू झालेला नाही आणि ज्यांना जामीनही मिळालेला नाही, असे बंदीवान) संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे मत नोंदवले आहे.
Lengthy Bail Hearings A Waste Of Time; Arguments Should Not Exceed 10 Minutes, Says Justice SK Kaul @awstika https://t.co/mjUTuBsIJh
— Live Law (@LiveLawIndia) December 9, 2022
संपादकीय भूमिकासर्वोच्च न्यायालयाने असे होण्यासाठीही प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते ! |