कोप्पळा (कर्नाटक) येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी पाद्य्रासह तिघांच्या विरोधात तक्रार
कोप्पळा (कर्नाटक) – कारटगी गावातील रामनगर येथे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पाद्य्रासह तिघांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. यात चर्चचा पाद्री सत्यनारायण उपाख्य स्यॅमुअल, शिवम्मा उपाख्य सारा आणि चिरंजीवी डॅनिअल यांचा समावेश आहे. तक्रार करणारे शंकर यांच्या कुटुंबियांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित केल्याचा आरोप या तिघांवर आहे.