नाशिक येथील पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्या जेसीबीने तोडल्या !
‘स्मार्ट सिटी’च्या विरोधात पुरातत्व विभागाची विभागीय आयुक्तांकडे तक्रार !
नाशिक – प्रोजेक्ट गोदांतर्गत ‘स्मार्ट सिटी’च्या वतीने गोदाघाट परिसरात सुशोभिकरणाची कामे केली जात आहेत; मात्र सुशोभिकरणाच्या नावाखाली ‘स्मार्ट सिटी’कडून पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरात जेसीबीच्या साहाय्याने पायर्या तोडल्या होत्या. याविषयी पुनर्बांधणीच्या सूचना देऊनही स्मार्ट सिटीकडून कोणतीही कृती करण्यात आलेली नाही. यामुळे पुरातत्व विभागाने स्मार्ट सिटीच्या कारभाराची तक्रार थेट विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
नीलकंठेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. स्मारकांच्या परिसरात कुठेही विकास करावयाचा असल्यास पुरातत्विक संकेतानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार तो होणे अपेक्षित असते; मात्र मंदिर परिसरात काम करतांना स्मार्ट सिटीच्या वतीने पुरातत्व विभागाचे कोणतेही मार्गदर्शन घेतलेले नाही, तसेच या मंदिर परिसरात असलेल्या पायर्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पूर्वीप्रमाणे तशा आकाराच्या आणि त्याच बसवण्याविषयी पुरातत्व विभागाने स्मार्ट सिटीला सूचना दिलेल्या होत्या; मात्र ९ मासांचा कालावधी उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकाराविषयी स्थानिक नागरिकांनी आक्षेप नोंदवत पुरातत्व विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
संपादकीय भूमिकापुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पायर्या तोडण्यास अनुमती देणार्या ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! |